यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बु ॥ येथील शेतकरी काल रविवारपासून बेपत्ता झाला होता. त्यांच्या शेतातील विहीरीत त्यांचा मयतस्थितीत मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी महेश पंढरीनाथ माळी (वय-४०) हे शेतकरी असून शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. १६ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात जावून येतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. परंतु ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरी परत आले नाही म्हणुन कुटुंबातील मंडळीने शेतात जावुन शोध घेतले असता शेतातील विहीरीच्या ठीकाणी मोटरसायकल व विहीरीजवळ त्याचे बुट मिळुन आली मात्र माळी हे दिसुन आले नसल्याने पुनश्च कुटुंबातील मंडळीने गावातील पट्टीचा विहीरीतून प्रेत शोधणाऱ्या कैलास कडु थाटे यास विहीरीत उतरून शोध घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला असता तो मिळुन आला नाही. याप्रकरणी यावल पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, आज महेश माळी यांचे मोठे भाऊ किरण पंढरीनाथ माळी वय ४५ वर्ष आपल्या नातेवाईकांकडे शोध घेतला तो मिळुन आला नाही , अखेर किरण माळी यांनी यावल पोलीसात भाऊ महेश माळी हरवल्याची खबर दिली असता , आज दुपारच्या सुमारास महेश माळी यांचा मृतदेह किनगाव शिवारातील त्यांनी केलेल्या नफ्याच्या शेतातील विहीरीत मिळुन आला असुन , माळी यांनी आत्महत्या केली की ते विहीरीत पडले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही . घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाच पोळे, पोलीस अमलदार सुनिल तायडे हे करीत आहे .