जळगाव प्रतिनिधी । जप्त असलेले ट्रॅक्टर सोडविण्यासाठी प्रांताधिकार्यांनी दिलेल्या आदेशात खाडाखोड करुन शासनाची फसवुणक करणार्या संशयित आरोपीचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
संशयीत आरोपी धनंजय बाळासाहेब भोसले याच्याकडे एमएच १९ ओवाय ३०५६ क्रमांकाचे ट्रॅक्टर सोडविण्यासाठी चाळीसगाव प्रांतधिकार्यांची ऑर्डर झाले आहे. ही ऑर्डर घेवून संशयीत आरोपी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गेला आणि त्या आदेशात खोडाखाड करुन एमएच १९ २०५६ क्र्रमांकाचे ट्रॅक्टर सोडविण्याबाबत त्याने आदेश दाखविले. या आदेशाबाबत पोलिसांना शंका आल्याने त्याने लागलीच चाळीसगाव प्रांतधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधून याबाबत तपासणी केली. यावेळी कार्यालयाकडून त्यांना केवळ एमएच १९ सीवाय २०५६ सोडण्याचा आदेश झाला असल्याचे सांगण्यात आले. परंतु संशयित आरोपी याने शासनाच्या आदेशात खोडाखाड करुन शासनाची फसवणुक करीत असल्याचे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो पोलीस स्टेशनमधून पळून जात होता. यावेळी इतर पोलिसांनी त्याला अटक करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यता आली.
न्यायालयाने फेटाळला संशयीताचा जामीन अर्ज
याप्रकरणी संशयित आरोपी धनंजय भोसले चाळीसगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांकडे दोषारोप पत्र दाखल झाल्याचा आधार घत जिल्हा सत्र न्या. आर. जे. कटारिया यांच्याकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज कामकाज झाले असता संशयीत आरोपीने शासनानच्या आदेशात खोडाखाड करुन फसवणुक करीत असल्याचे सांगत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ऍड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.