पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. १ ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या मूख्य यार्डात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार किशोर पाटील होते. तर सभा माजी आमदार तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रशासक अनिल महाजन, रणजित पाटील, चंद्रकांत धनवडे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, माजी सभापती दिगंबर पाटील, दगाजी वाघ, जयंतराव पाटील, नानासाहेब देशमुख, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, शाम भोसले, नितीन तावडे, बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक ब्राम्हणे, पंढरीनाथ पाटील, व्यासपीठावर होते.
पाचोरा बाजार समितीची सन – २०१९ नंतर प्रथमच वार्षिक सभा घेण्यात आली. सचिव बी. बी. बोरुडे यांनी प्रास्ताविक करतांना समितीचा लेखाजोखा मांडला व कोरोना काळात पाचोरा बाजार समितीने राज्यात सर्वात जास्त भाव सुर्यफुलास देवून खरेदी केल्याने समितीचे राज्यभर कौतुक केल्याचे सांगितले. यावेळी बाजार समितीच्या निवडणूका थेट शेतकऱ्यांच्या मतदानाने होणार असल्याने निवडणुकीत बाजार समितीवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याने सर्व हेवेदावे बाजुला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रगतीचा दृष्टीकोन समोर ठेवून बाजार समितीच्या निवडणुका पार पाडाव्यात असे मनोगत आमदार किशोर पाटील व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला प्रकाश पाटील, मनोज (अप्पा) पाटील, सुदाम पाटील, शालिकराम मालकर, जयसिंग परदेशी, विलास जोशी, खलील देशमुख, प्रा. भागवत माहलपूरे, राजेंद्र पाटील उपस्थित होते.
या शेतकऱ्यांचा झाला गौरव –
पाचोरा व भडगाव तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते शिल्ड, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यात भडगाव तालुक्यातील देविदास पाटील, मनोज पाटील, विनोद परदेशी, अनिल पाटील, संदिप पाटील, सोमनाथ पाटील, संजय महाजन, पाचोरा तालुक्यातील प्रविण पाटील, समाधान मालकर, सुनिल पाटील, हरीष चौधरी, सुनिल चौधरी, मयुर वाघ, माधव मालकर, शिवदास राठोड, देविदास पाटील, भागवत पाटील, अन्ना परदेशी तर व्यापारी बांधव – प्रतिक मोर, परेश जैन, प्रकाश बांठीया, राहुल पाटील सह अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बाजार समितीचे कर्मचारी यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन प्रा.सी.एन.चौधरी व महेश कौंडिण्य तर उपस्थितांचे आभार प्रशासक अनिल महाजन यांनी मानले.