रामदेववाडी अपघातातील आरोपी हा अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा – एकनाथराव खडसे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील रामदेववाडी येथील अपघातप्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नवे खुलासे केले आहे. त्यांनी या अपघातात राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोपही केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी अपघातात चार जण ठार झाले आहेत. मात्र या अपघातात कारचालक आणि त्यात बसलेली मुले ही मोठ्या नेत्यांची मुले असल्यानं या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास हा समाधानकारक नाही. पोलीस कोणाच्या तरी दबावखाली असून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारगटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा आरोपी असल्याने राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर केला आहे.

एकनाथराव खडसे यावेळी म्हणाले की, या सगळ्या प्रकरणात ज्या पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. या घटनेत अजून आरोपी आहेत ते पोलिसांनी निष्पन्न करावे. अपघाताचा घटनेनंतर पोलिसांनी १७ दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आपण गृहमंत्र्यांपासून ते पोलीस अधीक्षकांकडे स्वतः पत्र देऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

पुढे खडसे म्हणाले की, कारवाईला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र ही कारवाई फारशी समाधानकारक झाली नाही. आरोपींना रुग्णालयात भरती केल्याचे सांगण्यात आले. मात्र 17 दिवस त्यांना दवाखान्यात ठेवण्यात आले, अशी त्यांची परिस्थिती नव्हती. पोलीस राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवत असल्याचं चित्र आहे. यात आरोपींच्या वडिलांचे जिल्ह्यातील एका मंत्र्यांशी संबंध आहेत. तर दुसरा मुलगा हा राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा असल्याने या प्रकरणावर राजकीय दबाव आहे.

Protected Content