अमळनेर (प्रतिनिधी)जि.प. प्राथमिक शाळा धाबे, ता. पारोळा येथे आयोजित दि. २३ मे ते ०१ जून २०१९ आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप करण्यात आला. उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे शालेय पोषण आहार वाटप सुरु आहे. त्यांची शाळेत उपस्थिती वाढावी व सतत टिकुन राहावी, म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे सतत प्रयत्न करीत आहेत.
विदयार्थ्यांना शाळेच्या अभ्यासाच्या ताणतणावातुन मुक्त करून मनोरंजन व शिक्षणही मिळेल, असे उपक्रम शाळेने हाती घेतले आहेत व मिळालेल्या वेळेचाही सदुपयोग़ करुन घेत आहेत. गेल्या ४ मे पासुन वाचनातुन समृध्द होऊ या सारे, मैत्री पुस्तकांशी हा उपक्रम सुरुच आहे. सकाळच्या वेळी विदयार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने खेळ खेळण्याचे व खेळाची माहिती व नियम अवगत होण्यासाठी दि २३ मे ते १ जून २०१९ अखेर १० दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका प्रा. श्रीमती रोहिणी गोविंदा जाधव यांनी खुपच उत्कृष्टपणे आदिवासी लहान बालकांना शारिरीक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, कबड्डी, धावणे, लांब उंडी, उंची उडी, खो-खो यासारख्या मैदानी खेळांचे नियम व कसे खेळावे, आपली शारिरीक क्षमता, चपळता, खिलाडु वृत्ती कशी जोपासावी, शिस्त कशी पाळावी, याबाबत परिपुर्ण प्रशिक्षण दिले. तसेच गोणपाट धावणे, संगित खुर्ची, आंधळी कोशिंबिर, लिंबु चमचा असे मनोरंजनात्मक खेळही घेतले. तसेच विदयार्थीनींना आत्मरक्षणाचे व स्वतःची सुरक्षा कशी करावी याबाबतही धडे प्रात्यक्षिकासह दिले.
प्रा. श्रीमती रोहिणी गोविंदा जाधव या राणी लक्ष्मीबाई महाविदयालयात क्रिडा शिक्षिका असुन खेळांचे ज्ञान माहिती नियम याबाबत तज्ञ आहेत. मागच्या वर्षी त्यांच्या महाविद्यालयातील सर्व विदयार्थ्यांनी त्यांना बेस्ट कोच हा पुरस्कार देवुन सन्मानीत केले आहे. बरेच खेळासंबंधी पुरस्कार चषक ट्रॉफी त्यांनी मिळविल्या आहेत. आपल्या विदयार्थ्यांनी आपल्याला पुरस्कृत करणे ह्या सारखा मोठा सन्मान नाही. नऊ महिन्याचे लहान बाळ घरी असतांनाही धाबे शाळेच्या आदिवासी बालकांना त्यांनी वेळ ,प्रशिक्षण,आनंद दिला म्हणुन मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी सौ. चित्रा पाटील यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करून आभार मानले. त्यांचे पती चिखलोड शाळेचे उपशिक्षक राहुल रविंद्र पाटील यांचे या उपक्रमाला अनमोल सहकार्य लाभले, त्यांचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी आभार मानले. या प्रसंगी सौ. चित्रा पाटील यांच्याकडुन सर्व बालकांना बिस्किटपुडे व सोनपापडी वाटप करण्यात आली.
https://www.youtube.com/watch?v=xnZzPHcLhTM&feature=youtu.be