‘त्या’ निर्णयावर संपूर्ण संघाचे होते एकमत : रवी शास्त्री

MS Dhoni Ravi Shastri

लंडन, वृत्तसंस्था | विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडले आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण शास्त्रींनी दिले आहे.

 

धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचे त्यावर एकमत होते. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरं असं की, धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असे तुम्हाला वाटतं का ?, असा सवालही शास्त्रींनी केला. सेमीफायनलमध्ये भारताला अवघ्या १८ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. सेमीफायनलच्या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या, पण धावा घेण्याच्या नादात तो धावचीत झाला आणि भारताची जिंकण्याची आशा मावळली. त्यामुळेच सुनील गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं.

त्यावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी हा खुलासा केला. धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नंतर फायदा करून घ्यायचा होता. तो मॅच विनर आहे, त्याचा असा उपयोग करून घेतला नसता तर तो गुन्हाच ठरला असता. संपूर्ण संघाचे त्यावर एकमत होते, असे शास्त्री यांनी यावेळी स्पष्ट केले. मिडल ऑर्डरमध्ये भारताला चांगल्या फलंदाजांची गरज असल्याचंही त्यांनी मान्य केले. इथे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. केएल राहुल होता, पण शिखर धवन जखमी झाला होता. त्यानंतर विजय शंकरचे जखमी होणे हा संघासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे संघाची एक बाजू कमकुवत झाली होती, असेही ते म्हणाले.

Protected Content