थायलंडने दिली समलिंगी विवाहांना मान्यता; ठरला तिसरा आशियायी राष्ट्र

बँकाँक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | थायलंडने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिण आशियातील हे पहिले राष्ट्र बनले असून, LGBTQ समुदायासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. १८ जून २०२४ रोजी विवाह समानता विधेयकाला थायलंडच्या सिनेटने मंजुरी दिली होती आणि आजपासून, २३ जानेवारी २०२५, हा कायदा अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे समलिंगी जोडप्यांना विषमलिंगी जोडप्यांप्रमाणे समान अधिकार मिळणार आहेत. यात मालमत्ता हक्क, कर लाभ, आणि कायदेशीर मान्यता यांसारख्या अधिकारांचा समावेश आहे. या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये ३११ जोडप्यांनी लग्नाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, या निर्णयामुळे विवाह नोंदणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.

तैवान आणि नेपाळनंतर, थायलंड हा आशियातील तिसरा देश आहे ज्याने LGBTQ समुदायासाठी समानतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हा निर्णय जागतिक स्तरावरही प्रेरणादायी ठरला आहे, जो इतर देशांनाही समानतेच्या मार्गावर विचार करण्यास प्रवृत्त करू शकतो. LGBTQ हक्कांच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल मानला जातो आणि या निर्णयामुळे थायलंडचा सामाजिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल अधिक ठळकपणे दिसून येते.

Protected Content