धरणगावात ‘पतसंस्था व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “सहकार से समृद्धी” या प्रेरणेतून आणि युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केलेले आहे, या बाबीचे औचित्य साधून सहकार भारती व धरणगाव शहरातील नागरी सहकारी पतसंस्थां आणि महाराष्ट्र शासनाचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धरणगाव, जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पतसंस्थांचे व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.

सहकाराच्या माध्यमातूनच ग्रामविकास व ग्रामविकासातून देशात समृध्दी आणण्याची मा पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उत्तरविण्या साठी सहकार सक्षम करू या. सक्षम सहकारासाठी सहकारात काम करणाऱ्या घटकांचे प्रशिक्षण सातत्याने करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून शासनाचा सहकार विभाग व सहकार भारती मिळून सहकार चळवळ निकोप करावी असे आवाहन सहकारी संस्था जळगाव जिल्हा उपनिबंधक श्री गौतम बल‌साणे यांनी केले. धरणगाव येथे वाणी मंगल कार्यालय येथे आयोजित धरणगाव शहरातील सर्व पतसंस्था व सहकार भारती जळगाव जिल्हा आयोजित पतसंस्था संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाच्या उद‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष व सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री चंद्रहासभाई गुजराथी हे होते.

दिनेश सोनानी यांनी गायलेल्या समाज है आराध्य हमारा या गीताने व भारतमाता पूजन व दिपप्रज्ववलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वामी विवेकानंद पत‌संस्थेचे व्यवस्थापक वासुदेव महाजन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहकार आरती राष्ट्रीय महिला प्रमुख सौ रेवती शेंदुर्णीकर, राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे पतसंस्था प्रकोष्ठ जिल्हाप्रमुख प्रशांत केले प्रशिक्षक म्हणून आलेले छत्रपती संभाजीनगरच्या वर्धमान नागरी पतसंस्थेचे‌ संचालक संभाजी राचूरे, ज्ञानेश्वर पत‌संस्थचे व्यवस्थापक व अंकेक्षक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, धरणगाव अर्बन बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी तसेच धरणगाव चे सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर हे उपस्थित होते. या प्रशिक्षणा साठी जिल्ह्याभरातू‌न ३०० प्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठा वरील सर्वमान्यवरांचा सत्कार धरणगावच्या पतसंस्थांच्या अध्यक्ष संचालकांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील यांनी सहकाराच्या सफलतेसाठी नियमीतपणे प्रशिक्षण व तरुणांना संधी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून सहकार भारतीच्या कामाचा आढावा घेतला.

प्रत्येक संस्थेच्या संबंधित घटकांनी सहकारात काम करतांना काळाची गरज ओळखून सहकाराच्या विकासासाठी काम करावे , केंद्र शासन न महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या मजबुतीकरणा साठी कंबर कस‌ली आहे. यात सर्वांनी सकारात्मकतेने सह‌भागी व्हावे, आपापल्या संस्थेचा कारभार पारदर्शी ठेवावा असेही श्री गौतम बलसाणे यांनी विचार मांडले . अध्यक्षीय भाषणात चंद्राहास गुजराथी यांनी सहकाराचे महत्व अधोरेखीत करून सहकाराच्या बळकटीकरणावर भर दिला.

पतसंस्थांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. माणुसकी व कायदा यांचा मध्यम मार्ग काढला व संस्थेचे कामकाज केले तर सभासद म्हणजेच पर्यायाने समाज व संस्था या दोघांचा विकास होवू शकतो.आपण संस्थेचे विश्वस्त आहोत व या भूमिकेतून काम करण्याची दृढ ईच्छा यामुळेच संस्थेचा विकास होईल; याची अनेक उदाहरणे समोर ठेवत श्री संभाजी राचुरे यांनी संस्थेच्या कामकाजात संचालकांचा सक्रीय व सजग सहभाग असावा असे प्रशिक्षण देताना सांगीतले.अधिकारी व कर्मचारी हे संस्थेचे कणा आहेत, कायदा व नियमांची काटेकोर अंमल बजावणी करताना निर्भिडपणे काम करावे व सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कामाचा निपटारा करावा असे प्रतिपादन करीत आबासाहेब देशमुख यांनी ऑडीटच्या दृष्टीने झालेले बदल सर्वांना समजावून सांगीतले. तर सुशील गुजराथी यांनी वसूली करतांना घ्यावयाची काळजी, कर्तव्यतत्परता , ठेवी संकलन व कर्ज वितरीत प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले .श्री व्यंकटेश पतसंस्थेचे व्यवस्थापक किरण वाणी यांनी सूत्रसंचालन केले जनकल्यान पतसंस्थेचे व्यवस्थापक दिपक चौधरी यांनी आभार मानले.

धरणगाव तालुकाप्रमुख सहकार भारती व हिंगलाजमाता पतसंस्थेचे चेअरमन हेमंत जोशी, धरणगाव शहरप्रमुख सहकार भारती हिंगलाजमाता पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश चौधरी, पतसंस्थांचे चेअरमन अॅड वसंतराव भोलाणे, प्रा.सम्राट परिहार, शिरीषकुमार बयस, सुरेश चौधरी, सुनिल सोनार, यतिन भाटिया, प्रकाश मकवाने, सुभाष भागवत, मोतीलाल महाजन,दिपक चौधरी तसेच शहरातील सर्व पतसंस्थांचे व्यवस्थापक बद्रीनाथ भाटीया, वाल्मीक बागुल, राजेंद्र महाजन, किरण मराठे, प्रसाद कासार, गणेश महाजन, नरेंद्र पाटील, प्रकाश चौधरी यांनी परिश्रम घेतले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी धरणगाव, जळगाव, पाचोरा, चोपडा, पारोळा, एरंडोल, भुसावळ, रावेर,जामनेर, भडगाव,अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यातील संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content