नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आज उध्दव ठाकरे यांच्या गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने परवा रात्री उशीरा शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्ह हे आज दुपारी एक वाजेपर्यंत सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने दोन्ही बाजूंकडून नाव आणि निशाण्यांचे पर्याय आज सादर करण्यात येत आहेत. यासोबत उध्दव ठाकरे यांच्या गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.
या संदर्भात आज खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्णय हा नैसर्गिक न्यायाला धरून नाही. यासाठी आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. नेमकी हीच बाब नमूद करत आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.