धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपचे खासदार उमेश पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी मुंबई उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या अनुषंगाने धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत उमेश पाटील आणि करण पवार यांचे स्वागत केले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे दावेदार असलेले खासदार उमेश पाटील यांनी चांगले कामगिरी करून देखील भाजप पक्षाने त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली नाही. यामुळे नाराज झालेले उन्मेश पाटील आणि पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी बुधवारी ३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहे ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव शहरातील ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शरद माळी, किरण अग्निहोत्री, हेमांगी अग्निहोत्री, संतोष सोनवणे, परमेश्वर महाजन, सुनील चव्हाण, भीमराज धनगर, लक्ष्मण माळी, गजानन महाजन, रवींद्र जाधव, राजेंद्र ठाकरे, विजय पाटील, विनोद महाजन, बापू महाजन, राजू बोरसे, रणजीत राजपूत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.