पहूर. ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी भरत लिंगायत आणि सध्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे नियुक्त झालेले पहूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे यांचा सत्कार नाशिक पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.पी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पहूर पोलीस स्टेशन गुरनं 308/2019भादवि कलम 302,304,(2),510या गुन्ह्याचा योग्य रितीने तपास लावुन गुन्ह्यातील आरोपी विरूध्द ठोस पुरावे गोळा करून आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावास व तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक डाॅ.बी. जी. शेखर पाटील परीक्षेत्र नाशिक यांनी दखल घेत पहूर पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे सध्या नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पहूर पोलीस स्टेशन चे कर्मचारी भरत लिंगायत यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्याबद्दल श्री प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक जळगांव, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग, भरत काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग, पहूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, किरण बगाले पोलीस निरीक्षक जळगांव, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व पहूर पोलीस कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.