जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगर परिसरातील धामणवाडा येथे हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील समतानगर परिसरात असलेल्या धामणवाडा या परिसरात संशयित आरोपी राहुल नवल काकडे (वय-२३) रा. समता नगर, जळगाव हा हातात लोखंडी कोयता घेऊन धाक दाखवत, “मी या गल्लीचा दादा आहे, माझ्या नादी लागल तर या कोयताने एकाला मारून टाकेल” असे बोलून दहशत पसरविले. ही माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत संशयित आरोपी राहुल काकडे याला मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अटक केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, पोलीस नाईक, राजेश चव्हाण, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, उमेश पवार, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.