जम्मू, काश्मीर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.
श्रीनगरच्या लाल चौकातील मैसूमा परिसरासह पुलवामा येथील लजुरा गावात दहशतवाद्यांनी हल्ला केला. मैसूमा परिसरात झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना लष्कराने तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.
नाकाबंदी करून लष्कराने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त केली.
दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हे दहशतवाद्यांचे ठिकाण सापडले असून लष्काराने या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे.