Home राष्ट्रीय पुलवामात दहशतवादी हल्ला; १२ जवान शहीद, २० जखमी

पुलवामात दहशतवादी हल्ला; १२ जवान शहीद, २० जखमी


जम्मू (वृत्तसंस्था) कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला असून त्यात १२ जवान शहीद तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर गोळीबार करत आयईडी ब्लास्ट घडवून आणले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

अद्याप केंद्र सरकार किंवा लष्कराकडून मात्र याला दुजोरा मिळालेला नाही.
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या गाडीत अचानक मोठा स्फोट झाला. त्यामध्ये जवानांच्या वाहनाचे तुकडे-तुकडे झाले. या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यातील १२ जवान शहीद झाले तर २० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound