भीषण अपघात : महामार्गावर अपघातचा थरार; सहा प्रवाशांचा मृत्यू

गोरखपूर कुशीनगर महामार्गावर उभ्या बसला ट्रकची धडक

गोरखपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर-कुशीनगर महामार्गावर भरधाव ट्रकने मागून दोन बसेसला जोरदार धडक दिली. या अपघातात सहा प्रवाशी ६ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झालेत यातील १२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर पोलीस अधिकारी व वैद्यकीय टिम घटनास्थळी दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून रोडवेज कॉन्ट्रॅक्ट बस प्रवासी घेऊन पारौनाकडे जात होती. जगदीशपूरमधील मल्लापूरजवळ बसचेचाक पंक्चर झाले होते. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तसेच कंडक्टरने दुसरी बस मागवली होती. गोरखपूरहून आलेल्या रिकाम्या बसमध्ये प्रवाशांना बसवले जात होते. काही प्रवासी आधीच बसमध्ये चढले होते. यावेळी दोन्ही बसमध्ये अनेक लोक उभे होते. याचवेळी पाठीमागून भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसचे चाक दोन जणांवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे २७ जण जखमी झाले आहेत. यातील १२  जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. गोरखपूरमध्ये बस-ट्रकच्या धडकेनंतर अधिकारी सदर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. जखमींची संख्या मोठी असल्यानं आणखी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. अपघातस्थळी पाच रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. त्यांच्या मदतीनं जखमींना सदर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात अले आहे.

Protected Content