Home क्राईम एकलग्न गावाजवळ भीषण अपघात ; प्रौढाचा दुदैवी अंत !

एकलग्न गावाजवळ भीषण अपघात ; प्रौढाचा दुदैवी अंत !

0
167


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एकलग्न गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पोखरी गावातील एका प्रौढाचा दुदैवी मृत्यू झाल्याची मंगळवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २० जानेवारी रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश तानकू मराठे वय ५५ रा. पोखरी ता. धरणगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील पोखरी गावात राहणारे सुरेश मराठे हे मंगळवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एकलग्न शिवारातील त्रिमृर्ती हॉटेलजवळून त्यांच्या वाहनाने एरंडोलकडे जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा केला. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound