आकाशवाणी चौकात भीषण अपघात; दाम्पत्य गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील आकाशवाणी केंद्राच्या चौकात गुरुवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात महिलेचा एका हात आणि पायाचा चेंदामेंदा झाला आहे. जखमी झालेल्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. रागीनी चंपालाल पाटील वय-४५ रा. साई नगर, भुसावळ असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रागीनी पाटील या महिला ह्या आपले पती चंपालाल पाटील यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी २४६७) ने आकाशवाणी चौकातून जात असतांना भुसावळकडून पाळधीकडे जाणारा ट्रक क्रमांक (सीजी ०४ एलडब्ल्यू १२९९) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला रोडवर पडल्याने त्यांच्या एक हात आणि एक पायाचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेमुळे आकाशवाणी चौकात प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी जिल्हापेठ आणि रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली होती. खासगी वाहनातून जखमी महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.