श्रीलंकेच्या १० खेळाडूंचा पाक दौरा रद्द

malinga

मुंबई वृत्तसंस्था । श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या १० खेळाडूंनी आपले नाव पाकिस्तान दौऱ्यातून रद्द केली आहेत. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबकमध्ये पाकिस्तानात मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. परंतू खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौरा रद्द केला आहे.

सुत्रांनी दिलेली माहितीनुसार, भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावल्याचा थेट आरोपही पाकिस्तान सरकारचे मंत्री फवाद हुसैन यांनी केला आहे. भारताने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आयपीएल करार रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तानात येण्यास नकार दिल्याचे वक्तव्य फवाद हुसैन यांनी केले आहे. ज्या श्रीलंकेच्या खेळाडूंनी दौऱ्यातून आपले नाव रद्द केले आहेत. ते खेळाडू दिमुथ करुणारत्ने, टी-२० कर्णधार लसिथ मलिंगा, माजी कर्णधार एंजेलो मॅथ्यूज, निरोशन डिक्वेला, कुसल परेरा, धनंजय डीसिल्व्हा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे.

Protected Content