दाणा बाजार येथील टेम्पो चालकाला दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातील पीपल बँकेजवळ वाहतूक गाडीचा दरवाजा अडकून नुकसान झाल्याची भरपाई देण्याची मागणी केल्याच्या कारणावरून एका टेम्पो चालकाला दोन जणांनी शिवीगाळ करत लाथा लबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवार 4 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी 5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप अर्जुन चौधरी वय 31, रा.बजरंग चौक, मराठे गल्ली धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून टेम्पो चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. गुरुवार 4 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता जळगाव शहरातील दाणा बाजारातील पीपल बँकेसमोर त्याचे वाहन उभे असताना श्रीकांत प्रकाश मोरे याने गाडीचे दरवाजाचे नुकसान केले. नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असता याचा राग घेऊन दिलीप चौधरी या चालकाला श्रीकांत प्रकाश मोरेकर वय 34 रा. शिवाजीनगरझ जळगाव आणि वासुदेव पितांबर माळी वय-54 रा. तेली तलाव, धरणगाव या दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शुक्रवारी 5 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता दिलीप चौधरी या चालकांने शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे श्रीकांत मोरेकर आणि वासुदेव माळी या दोघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Protected Content