यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाचे तरुण उपसभापती तेजस धनंजय पाटील यांची इंडीयन रेडक्रॉस सोसायटी जळगावच्या सहयोगी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
तेजस पाटील हे यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल आमदार अमोल जावळे, जिल्हा परिषद परिषदेचे माजी सदस्य आर. जी. (नाना) पाटील, शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळू फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व खरेदी विक्री संघाचे संचालक तुषार उर्फ मुन्ना पाटील, तसेच शिवसेनेचे यावल तालुका संघटक भूषण (गोलू) पाटील आदी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आमदार अमोल जावळे यांच्या निवासस्थानी जाऊन स्वागत व कौतुक केले. या निवडीमुळे तेजस पाटील यांना सामाजिक आणि आरोग्यविषयक सेवेसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.