यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी तसेच समाजातील पीडित व अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
मंदाताई सोनवणे जिल्हाध्यक्ष, प्रल्हाद सोनवणे जिल्हा सचिव, तर गणेश भैय्या बारसे रावेर लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्त झाले. संघटनेच्या स्थापनेने जिल्ह्यात सामाजिक कार्याला नवा वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संघटनेचे इतर पदाधिकारी खालीलप्रमाणे :
▪ कार्याध्यक्ष: प्रतिभाताई शिरसाठ
▪ जिल्हा उपाध्यक्ष: स्मिताताई वेद, वंदना पाटील
▪ महासचिव: सुमनताई मराठे
▪ खजिनदार: डॉ. शंकरलाल सोनवणे
▪ सहसचिव: योगिता शुक्ल, कविता इंगळे
▪ संघटन सचिव: छाया सारस्वत
▪ प्रसिद्धी सचिव: अनिल सपकाळे
▪ सह संघटन सचिव: स्नेहा सोनवणे, सुजाता वाणी
▪ सल्लागार: रमेशचंद्र वेद, गिताताई शुक्ला
▪ कायदेशीर सल्लागार: ॲड. स्मिता झालटे, ॲड. सीमा जाधव
▪ प्रचार सचिव: शोभा कोळी
▪ कायदेशीर सदस्य: विजया पांडे
▪ सदस्य: सुरेश कोहली (पत्रकार), पुंडलीक सपकाळे, माजी डीवायएसपी राजेंद्र सोनवणे, प्रमोद वाणी, नारायण पाटील, सुनिल जाधव, डॉ. गोकुल कोळी