मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आशा स्वयंसेविका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी निशा जाधव उपस्थित होत्या.
या वेळी सन 2023-24 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन आशा स्वयंसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेत्या स्वयंसेविका पुढीलप्रमाणे आहेत:
प्रथम क्रमांक: विजया जाधव (वडोदा)
द्वितीय क्रमांक: माया जाधव (हलखेडा)
तृतीय क्रमांक: आशा गजानन बघे (चारठाणा)
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. त्यांनी आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक करताना, कोविड काळातील अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर, डॉ. प्रियदर्शी तायडे, डॉ. सुहास सपकाळ, डॉ. गणेश गडकळ, डॉ. सतीश निंभोरे, तालुका समूह संघटक सोनटक्के, आरोग्य सहाय्यक विजय पाटील व बाळू जयकर यांसह सर्व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.