यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड येथील तरुण ग्रामपंचायत सदस्य तथा यावल शेतकी खरेदी विक्री संघाचे महाराष्ट्रातील सर्वात तरुण संचालक तेजस पाटील यांची नॅशनल युथ कौन्सिलच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी निवड झाली.
निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या शिफाशीनुसार राज्य अध्यक्ष प्रशांत गुरव यांनी दिले. याआधी तेजस पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडली आहे. नॅशनल युथ कौन्सिल तरुणांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी नेहमीच काम करत असते. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तेजस पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा व प्रदेश स्तरावर राबविले गेले आहेत. तेजस पाटील हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांना विविध पुरस्कार या कार्यासाठी मिळाले आहे. तेजस पाटील यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून अभिनंदन वर्षाव होत आहे. नॅशनल युथ कौन्सिलने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे यावेळी तेजस पाटील यांनी सांगितले.