जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयुर्विम्यात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे विक्रमवीर विनोद ठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयसी जीवन विमा प्रतिनिधी भरती प्रक्रिया जळगावात उद्यापासून सुरू होत आहे.
जळगावातील विनोद ठोळे यांनी आयुर्विमा क्षेत्रात जळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. आयुर्विमा क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आणि नव व्यावसायिकांना, एलआयसी एजंटांना प्रोत्साहन देण्याचे काम विनोद ठोळे करीत आहेत. सध्या त्यांनी सर्वोच्च असलेली अमेरिकन संस्था एमडीआरटी चे सदस्यत्व मिळविलेले आहे. भारतात सर्वात जास्त एमडीआरटी एजंट घडविण्याचा त्यांनी पराक्रम केला आहे. आता त्यांच्याच मार्गदशर्नखाली इच्छुकांना आयुर्विमा प्रतिनिधी बनण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
एलआयसीतर्फे आता शनिवारी १३ व १४ रोजी दिवसभर विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत इयत्ता १० वी पास व १८ वर्षे पूर्ण असणारे तरुण मुलाखतीसाठी येऊ शकतात. संबंधीतांची मुलाखत कोर्टाच्या मागे असलेल्या रोझ गार्डन जवळ ’टिमवन कन्सल्टन्ट’च्या कार्यालयात होणार आहेत. जिल्ह्यातील तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्विमा विकासाधिकारी विनोद ठोळे यांनी केले आहे.
निवड झालेल्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात त्यांना तंत्रज्ञान, मार्केटिंग, संभाषण कौशल्य शिकविले जाणार आहे. तरुणांनी बेरोजगार राहू नये, त्यांना चांगल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी असा उद्देश असल्याचे विनोद ठोळे यांनी सांगितले. तसेच, विविध व्यावसायिक, महिला, पुरुष अर्धवेळ म्हणजेच पार्टटाइम देखील विमा प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात. त्यांनीही अर्ज करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. या संदर्भात इच्छुकांनी अधिक माहिति साठी ९४२२२२३०९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.