टीम इंडिया आज करणार काळे फीत परिधान

cricket teem

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. जेटली यांचे राजकारण व्यतिरिक्त क्रिकेटवर देखील प्रेम होते. यामुळे भारतीय संघ आज मैदानात उतरतांना काळ्या फीत लावून उतरणार आहे. त्याचबरोबर जेटली यांना श्रद्धांजलीही संघाकडून वाहण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, भारताचा संघ जेव्हा आज मैदानात उतरेल तेव्हा जेटली यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करणार आहे. भारतीय आज मैदानात उतरताना काळ्या फीत लावून उतरणार आहे. त्याचबरोबर जेटली यांना श्रद्धांजलीही भारतीय संघाकडून वाहण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. सेहवागने सांगितले की, अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या. त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे सेहवागने स्पष्ट केले.

Protected Content