पहूर पेठ ग्रामपंचायतीने केला शिक्षकांचा सत्कार

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या सभागृहात शिक्षक सन्मान सोहळ्याची सुमारे ३५ वर्षांची परंपरा कोरोना काळातही अखंड ठेवत शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

शिक्षकांच्या हातून राष्ट्र उभारणीचे कार्य घडते, विद्यार्थ्यांच्या बालमनाला आकार देत त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे शिक्षक खऱ्या अर्थाने समाजाचे शिल्पकार असतात, असे गौरवोद्गार माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे यांनी काढले. शिक्षक दिनानिमित्त सम्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

तत्कालीन सरपंच रामराव देशमुख यांनी शिक्षकांच्या सन्मानाची परंपरा सुरू केली.  त्यात प्रदिप लोढा सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी निवृत्त शिक्षकांनाही सन्मानित करण्याची प्रथम सुरू केली.  आज तागायत शिक्षक सन्मानाची ही परंपरा कोरोनाच्या काळातही अखंड राखत लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील यांनी शिक्षकांचा सन्मान केला.

प्रारंभी डॉ.  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त उर्दू शिक्षक रसूल शहा जनाब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप लोढा, अॅड एस.  आर.  पाटील,आर.  टी.  लेले हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक आर. बी.पाटील, अरुण घोलप, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, नागपुरे गुरुजी, निवृत्त मुख्याध्यापक व्ही. के. बडगुजर, साळुंखे मॅडम आदींनी मनोगतातून शिक्षकांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निताताई पाटील, उपसरपंच श्याम सावळे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचाऱ्यांनी शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचा श्रीफळ स्नेहवस्त्र देवून सत्कार केला. 

यावेळी गावातील शाळा सुरु करण्याचा मानस मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.  साहित्यिक रवींद्र पांढरे यांचा ‘सायड ‘ कादंबरी प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.  सूत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील यांनी केले.  आभार विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष किरण खैरनार यांनी मानले. या वेळी मधुकर पवार, गणेश राऊत,डी वाय.  गोरे, संतोष भडांगे, मनोज जोशी, संदीप बेढे, यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,माध्यमिक शाळांतील शिक्षक, अंगणवाडीतील शिक्षिका, मदतनीस, आशा सेविका, उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

महात्मा फुले शिक्षण संस्था 

पहूर कसबे येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेतर्फे शिक्षकांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.  संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, संचालक माजी सरपंच लक्ष्मण गोरे, सरपंच पती शंकर जाधव, संचालक रामचंद्र वानखेडे, उपसरपंच राजू जाधव, शिवाजी राऊत, शंकर घोंगडे, दीपक जाधव, गजानन सोनवणे,दीपक गवळी आदी मान्यवरांनी शिक्षकांचा सन्मान केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका व्ही. व्ही.  घोंगडे यांनी प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन युनुस तडवी, हरिभाऊ राऊत, अमृता सोनवने यांनी केले.  आभार शंकर भामेरे यांनी मानले.  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फेही शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.  शिक्षक दिनानिमित्त शाळेतर्फे निबंध लेखन,वक्तृत्व,रांगोळी, चित्रकला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला.

आर.बी.आर.कन्या माध्यमिक विद्यालय, पहूर. 

आर.  बी. आर.  कन्या विद्यालयात डॉ. सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ‘ शिक्षक दिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव पांढरे हे होते. तर प्रमुख अतिथी मा.समाधान थोरात हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार केला.  विद्यालयातील विद्यार्थीनींनी डॉ. राधाकृष्णन् यांच्या जीवनावर भाषणे दिलीत. शिक्षकांमधून श्री. आय.व्ही.पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन् यांचा जीवनपट सादर केला. अध्यक्षिय भाषण बाबूराव पांढरे यांनी केले. आभार मुख्यध्यापक मा.सुधीर महाजन सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती एस्.ए.पाटील मँडम यांनी केले.

सदर कार्यक्रमानंतर शिक्षकदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, काव्यगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content