मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची येत्या १० जूनला विधान परिषदेची निवडणूका होणार आहे. मात्र या निवडणूकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निवडणूक आयोगाला केली आहे. १५ जूनपर्यंत शाळांना सुट्टा आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का मोठया प्रमाणावर घटण्याची शक्यता असल्याचे कारण देत राज्य शिक्षक परिषदेने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
१५ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबईबाहेर आहेत. सोबतच ज्या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या कामाला लावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत १० जूनला शिक्षकांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली आहे.