जळगाव प्रतिनिधी । शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून याचे अहवाल हे ३६ तासांच्या आत मिळावे अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल त्वरीत मिळावे अशी मागणी केली. याप्रसंगी त्यांनी खालील मागण्या सादर केल्या.
मागण्या… :-
1. शिक्षकांना कोरोणा चाचणी साठी जिल्ह्याच्या ठिकाणी न बोलवता त्यांच्या नोकरी ठिकाणच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोय करून द्यावी.
2. शिक्षकांच्या कोरोणा चाचणीचे अहवाल 36 तासाच्या आत मिळावे याकरिता जिल्हा प्रशासनाने एक वेगळी यंत्रणा नियुक्त करावी.
3. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या ह्या 23 तारखेच्या आत म्हणजेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाकरता प्रवेश करण्याआधीच अहवाल व चाचण्या पूर्ण केल्या जाव्यात. जेणेकरून कोरोणा चाचण्या करता विलंब झाल्यास कुठल्याही विद्यार्थ्याला कोरण्याची इजा होणार नाही याची काळजी घेतली जावी.
दरम्यान, मराठे यांच्याशी चर्चा करतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन शिक्षकांना आप आपल्या नोकरी ठिकाणच्या जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणीची सोय करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षकांना येण्याची गरज नसून त्यांचा चाचणी अहवाल ३६ तासातच मिळणार. तसेच सर्व शिक्षकांच्या चाचण्या २३ तारखे आधीच होतील अशी ग्वाही जिल्हाधिकार्यांनी दिली असल्याची माहिती देवेंद्र मराठे यांनी दिली आहे.