शिक्षक आमदार काळे यांनी दिली मा.आ. वाघ यांच्या निवासस्थानी भेट

पाचोरा प्रतिनिधी । येथे पंचायत राज समीतीच्या भेटी दरम्यान शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी माजी आमदार दिलीप वाघ यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी त्याची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी विविध विषयांवर निवेदन दिले.

शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान संजय वाघ यांनी शिक्षकांच्या विवध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वात आमदार विक्रम काळे यांना तालुक्यातील विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने पाचोरा – भडगाव तालूक्यातील अनेक गावे  पोखरा योजनेपासुन वंचित असुन त्या सर्व गावांना पोखरा योजनेत सहभागी करण्यात यावे.पाचोरा तालुक्यातील १२७ गावे ही डार्क झोनमध्ये असल्याने महाराष्ट्र शासनाच्या १०० टक्के अनुदान असलेल्या अहिल्याबाई सिंचन विहिर योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसाल मुंडा योजना आदींचा गेल्या चार वर्षापासुन लाभ मिळत नसल्याने ही सर्व गावे डार्क झोन मधुन काढण्यात यावी.

पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, १५ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुटसूटीत व्हावी तसेच पी. एफ. एम. एस. प्रणाली रद्द व्हावी, गेल्या तीन वर्षापासुन वैयक्तिक लाभाचे गोठाशेड, सिंचन विहीरी तथा शेतशिवार रस्त्याची कामे पाचोरा पंचायत समितीमध्ये प्रलंबित आहेत यातील गरजु व योग्य लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्यावा, सन – २०१८ ते २०२१ च्या कालावधित पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना यांच्या लाभार्थ्यांचे प्रस्थाव प्रलंबित असल्याने अनुदान तत्काळ अदा करावे व नविन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समीती प्रशासनास सुचित करावे, गेल्या काही वर्षांपासुन पाचोरा पंचायत समीतीमध्ये विविध तक्रारी व समस्या प्रलंबित असुन त्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी यंञणा उभारण्यात यावी. अशा स्वरुपाच्या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आल्या. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, बाजार समिती प्रशासक रणजीत पाटील, राष्टवादी काॅग्रेस युवक उप जिल्हाध्यक्ष पंकज गढरी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अभिजित पवार, नगरदेवळा शहराध्यक्ष सूनिल तावडे व नगरदेवळा उपसरपंच विलास पाटील यांच्या सह्या आहेत.

 

Protected Content