Home क्राईम आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

आत्महत्येचा प्रयत्न करणारा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

0
34

मुंबई प्रतिनिधी । आमदार निवासातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक गजानन खैरे यांची समजूत घालण्यात आल्याने ते खाली उतरले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार भवनातील इमारतीवर चढून गजानन खैरे या शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न  केल्याने बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. आपल्याला वेतन मिळावे अशी मागणी या शिक्षकाने केली आहे. दरम्यान, विधानसभाध्यक्ष नाना पटोले व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी पोहचून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बराच वेळ या मान्यवरांनी समजूत काढल्यानंतर अखेर गजानन खैरे यांनी इमारतीवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली उतरताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.


Protected Content

Play sound