बलात्कार थांबवण्यासाठी संस्कृत श्लोक शिकवा : भगतसिंह कोश्यारी

bhagat singh koshyari 1567320794

 

नागपूर (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गुरुवारी बोलताना त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवण्याचा सल्ला कोश्यारींनी दिला.

 

राज्यपाल आपल्या भाषणात मुलांना चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक समजवून सांगत होते. हे लोक आपले ज्ञान, शक्ती आणि पैशाचा कसा वापर किंवा गैरवापर करतात, याविषयी कोश्यारी बोलत होते. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केले जात होते . परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असेही ते म्हणाले.

Protected Content