जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेच्या अप लाईनवर धावत्या रेल्वेखाली 20 वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत लोहमार्ग रेल्वे पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रेल्वे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाजवळील बजरंग बोगद्याजवळ रेल्वे खंबा क्रमांक 418/8-10 जवळ एक 20 वर्ष वयोगटातील तरूणीने धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याचे सकाळी 10 वाजेच्य सुमारास उघडकीस आली. तरूणीच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्या स्पष्ट झालेले नाही. चेहऱ्याने गोरी, सरपातळ, पाच फुट उंची, शरीर बांधा मध्यम असून अंगावर निळ्या रंगाची कापडी टिशर्ट आणि हाफ पॅट असे वर्णन असून मयत तरूणीचे ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. याबाबत स्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरून लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढीत तपास रविंद्र ठाकूर करीत आहे.