तापीमाईच्या जन्मोत्सवाची जय्यत तयारी

भुसावळ प्रतिनिधी । तापी नदी जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी तापी नदीचे पूजन केले जाणार असून याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शहरातील विविध संस्थातर्फे गत अनेक वर्षांपासून तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येतो. या अनुषंगाने तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीसह अन्य ९ संस्थांतर्फे सकाळी १०.३० वाजता विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त इंजिन घाटाजवळ तापी नदीची ओटी भरून वस्त्र अर्पण केले जाणार आहे. त्यानंतर आरती केली जाईल. याला भाविकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन तापी उत्थान एवं उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत वैष्णव यांनी केले आहे.

Protected Content