बारामती वृत्तसंस्था । अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. मात्र चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘संभाजी ब्रिगेड’ चांगलीच आक्रमक झाली आहे.
तान्हाजीच्या ट्रेलरमध्ये संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी फेकून मारत असल्याचे दाखवल्याने संभाजी ब्रिगेडने हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. नाहीतर ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. प्रत्येक चित्रपटात काहीतरी गंभीर आणि चुकीचं, वादग्रस्त दाखवून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपटातून हा प्रसंग वगळला गेला पाहिजे. एवढीच ‘संभाजी ब्रिगेड’ची माफक अपेक्षा आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. दरम्यान, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.