पहूर ता. जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा चंदन कुमावत मंगल कार्यालय पहूर येथे पार पडला.
पहूर पेठचे सरपंच निता पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, माजी जि. प. कृषी सभापती प्रदिप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, आत्मा समिती सदस्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषि अधिकारी डाँ. अभिमन्यू चोपडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सागर बंड, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद, किरण मांडोळे विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद, मनीषा पाचपोळ जिल्हा संसाधन व्यक्ती व वैभव बोंद्रे, अग्रोनोमीस्ट झायडेक्स प्रा.ली. लाभले.
सदर कार्यकमा मध्ये विविध पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, बदलत्या हवामान नुसार करावयाच्या उपाययोजना, खत व्यवस्थापन, खत बचत, शेंद्रीय शेती व सूक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत येणारे विविध उद्योग, लाभार्थी पात्रता मिळणारे अनुदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस मंडळ कृषी अधिकारी निता घार्गे, कृषी पर्यवेक्षक कन्हैया महाजन, तालुका तंत्र व्यवस्थापक आत्मा राकेश पाटील, पी.पी.पवार कृषी सहय्यक व तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व परिसरातील शेतकरी व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस पाटील यांनी केले तर सुनील गायकवाड यांनी आभार मानले.