एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल येथे नुकतीच भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुकास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात बूथ सशक्तिकरण, नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णया बाबत भारतीय जनता पार्टीचे जळगाव (पश्चिम) जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, मा.खा.ए.टी. पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील, एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख गोविंद शिरोळे, तालुकाध्यक्ष राजेंद्रसिंग पाटील, लोक नियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, अॅड. रघुदादा राजपूत यांनी मार्गदर्शन केले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट कार्यालय मंत्री म्हणून कामगिरी पार पाडल्याबद्दल अमरजितसिंग साहेबराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले.सदर बैठकीस उपस्थित नरेंद्रसिंग पाटील , निलेश भाऊ परदेशी, भिका कोळी तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते तसेच असंख्य कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. बैठकीचे सूत्रसंचालन सचिन विसपुते यांनी केले.