कोरोना गेला खड्यात, आधी एफआरपीचे पैसे द्या — राजू शेट्टी

 

 

सांगली:  वृत्तसंस्था ।  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफआरपी आणि वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या अशी भूमिका येथून पुढे आम्ही घेणार, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

 

विधिमंडळाचं सर्व अधिवेशन अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये गेले. बाकीचे प्रश्न नाहीत का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

 

मी महाआघाडी मध्ये आहे म्हणून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही असे नाही. या कोरोनाच्या काळात आम्ही शांत आहे. आता कोरोना गेला खड्यात पाहिले एफआरपीचे पैसे द्या, अशी भूमिका येथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

 

सरकारला मंत्र्याची दालन सजवायला पैसे आहेत आणि वीज ग्राहकाची वीज बिल माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. यासाठी आम्हाला आता रस्स्यावर उतरवावे लागेल, असा इशारा ही शेट्टी यांनी दिला.विधिमंडळाचे अधिवेशन हे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरुन गाजले गेले.महाराष्ट्रात दुसरे कोण राहत नाही का? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, वाढीव वीजबिल हे सर्व प्रश्न बाजूला राहिले, अशी टीका शेट्टी यांनी केली. जोपर्यंत सर्व सामान्य माणसामध्ये बदल होत नाही. तो पर्यंत हे बदलले जाणार नाही. सामान्य माणूस बोलला पाहिजे.तरच हे सर्व जण बदलतील, असेही शेट्टी म्हणाले.

 

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. 19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असंही राजू शेट्टी म्हणाले

Protected Content