धरणगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

dharangav spardha

धरणगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग आणि येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्य युवा संसद युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ अंतर्गत धरणगांव-एरंडोल गट क्र. २ अंतर्गत आज (दि.२४) तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा. डॉ.टी.एस. निरागदार होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.चे गटविकास अधिकारी सौ. स्नेहा पवार, गटशिक्षण अधिकारी ए.पी. बाविस्कर व उपगटशिक्षण अधिकारी श्री.बि-हाडे उपस्थित होते. तसेच डी.डी.एस.पी. महाविद्यालय एरंडोल उपप्राचार्य डॉ.एस.पी. पाटील, धरणगांव
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.आर. पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल. खोंडे हे ही उपस्थित होते.

स्पर्धेत एरंडोल व धरणगाव तालुक्यातील १० कनिष्ठ महाविद्यालयातील २७ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रा. साळवे यांनी केले तर पर्यवेक्षणाचे काम प्रा.व्ही.आर. पाटील, प्रा.आर व्ही. बोरसे, प्रा.जी.पी. चौधरी यांनी केले. स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक- भावसार कौस्तुभ दिनेश – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगांव, व्दितीय क्रमांक- पेंढारकर निशिता सुधीर, – डी.डी.एस.पी. महाविद्यालय, एरंडोल, तृतीय क्रमांक- भिल निकीता राजेंद्र – इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा कार्यक्रमांच्या शेवटी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. श्रीमती आर.पी.चौधरी, प्रा.यु.व्ही. पाटील, प्रा.सौ.एन.एम.पवार, प्रा.सौ.आर.सी. पवार, प्रा.के.ए. चौधरी, किरण सुतारे, आर.बी. चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content