Home क्राईम अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
107


वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील मकरंद नगरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कामावरून घरी जात असतांना घरी सोडून देण्याच्या बहाणा करत अंधाराचा फायदा घेत अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याची घटना रविवारी १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता कामावरून घरी जात होती. त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र जोहरीलाल जैन वय ५० रा.वरणगाव याने पिडीत मुलीला घरी सोडून देण्याचा बहाणा करत तिला दुचाकीवर बसून नेत अंधाराचा फायदा घेत तिच्या सोबत अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी आरोपी राजेंद्र जोहरीलाल जैन वय ५० रा.वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.


Protected Content

Play sound