पुतळा कोसळल्याच्या प्रकारावर कठोर कारवाई करा; छावा संघटनेची मागणी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळलेल्या दुर्घटनेतील ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे अधिकारी कारणीभूत यांच्या कडक कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन पारोळा शहरातील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना देण्यात आले.

या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय छावा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. निवेदना देतेवेळी तालूकाध्यक्ष विजय पाटील व शहराध्यक्ष ईश्वर पाटील गणेश पाटील, गिरीश पाटील, मनोराज पाटील, लोकेश महाजन, नितीन पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content