Home Cities मुक्ताईनगर शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर करवाई करा; राष्ट्रवादीचे निवेदन

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर करवाई करा; राष्ट्रवादीचे निवेदन

0
20

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटक राज्यातील राजधानी बंगरूळ येथे पुतळ्याची विटंबना झाल्याचे धक्कादायक प्रकार घडल्यानंतर देखील  राज्यातील भाजप सुस्त पद्धतीने बसलेले आहे. छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणार आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांच्या भावना अत्यंत तीव्र असून मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि भविष्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासंदर्भात दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.

या निवेदनावर मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाने, विजय सोनार, विलास तायडे, शिवराज पाटील, बापू ससाने, सुभाष पाटील, सोपान दुट्टे, सोपान पाटील, विकास पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound