Home क्राईम विष घेतलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

विष घेतलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू


Crime

जळगाव, प्रतिनिधी । विरवाडे येथील 45 वर्षीय व्यक्तीने फवारणीचे विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न रविवारी केला होता. आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील 45 वर्षीय राजु बाबु भिल्ल यांनी विष प्राशन केले होते. कुटूंबीयांनी रविवारी राजु भिल यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरु असतांना बुधवार (ता.4) रोजी मृत्यु झाल्याचे डॉ. सुरज जगताप यांनी कळवल्यावरुन रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास विश्‍वनाथ गायकवाड करीत आहे.


Protected Content

Play sound