पतंजलीच्या बनावट वेबसाईटवरून फसवणूक करणारा भामटा अटकेत

news crime news

जळगाव प्रतिनिधी । पतंजली एजन्सीची बनावट वेबसाईट बनवून जळगावसह राज्यातील अनेकांना लाखोंचा चुना लावणार्‍या बिहारमधील महाठगास जळगाव सायबर सेलच्या पथकाने बिहारातील बिहारशरीफ गावातून अटक केली आहे.

असे आहे आरोपीचे नाव
नितीशकुमार (बिहारशक्ती, नांलदा, बिहार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी जळगावातील एकाला पतंजलीची एजन्सी व वस्तू देण्याच्या नावाखाली सहा ते सात लाखात गंडवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव सायबर सेलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार प्रवीण वाघ, नाईक दिलीप चिंचोले यांच्या पथकाने आरोपीला बिहारशक्तीमधून अटक केली. सायंकाळपर्यंत हे पथक आरोपीला घेवून जळगावात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Protected Content