रावेरात बैल व वासरी चोरणाऱ्या दोघांना अटक

रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथे एका गोठ्यातून बैल व वासरी चोरी प्रकरणी शहरातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

या बाबत वृत्त असे की, रावेर स्टेशन रोडवर एका पेट्रोल पंपा नजिक माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस गुरांचा गोठा आहे. या गोठ्यातून दि २७ फेब्रूवारी ते दि १० मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी ४० हजार रुपये किमतीचा एक बैल व २० हजार रुपये किमतीची एक जर्सी जातीची वासरी चोरुन नेऊन एकच खळबळ उडवुन दिली होती. या प्रकरणी आरोपी शकिल सलीम शेख( वय २७ रा. कुरीशी वाडा), अशपाक गफार शेख (वय २३ रा.पाण्याच्या टॉकी जवळ रावेर) या दोघांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोना महेद्र सुरवाडे यांच्याकडे असून पोना सुरेश मेढे, पोका समाधान ठाकूर, पोक विकार शेख, पोक प्रमोद पाटील, पोक अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Protected Content