जळगावातून चोरट्यांनी लांबविली दुचाकी

bike chori 201895 102842 05 09 2018

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सराफबाजारातुन दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. शनिपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोशीपेठेतील रहिवासी आकाश प्रकाश सुर्यवंशी यांच्या मालकीची हिरो पॅशन क्र (एम.एच.19. बीडी. 7384) मंगळवार (ता.3) रोजी दुपारी दिड वाजता सराफ बाजारात उभी असतांना अज्ञात चोरट्यांनी हि दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आकाश सुर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक प्रदिप जाधव करीत आहेत.

Protected Content