नवी दिल्ली-वृत्तसंस्था | महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी ३१ डिसेंबरच्या आधी आमदार अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यात गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर न्यायालयीन लढाई सुरू असून आता याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या हातात आहे. मात्र याबाबत निर्णय घेण्यात आलेला नसून याच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली. तसेच आज राष्ट्रवादीतर्फे दाखल अपात्रतेच्या याचिकेवरही सुनावणी झाली.
आजच्या दोन्ही एकत्र सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील अपात्रतेबाबत ३१ डिसेंबर तर राष्ट्रवादीतीपल अपात्रतेबाबत ३१ जानेवारी पर्यंत राहूल नार्वेकर यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहेत. यामुळे या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षातील अपात्रतेबाबत डेडलाईन आखून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.