जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील यांच्याबद्दल सागर प्रभाकर पाटील या तरुणाने फेसबुकवर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला. बदनामी केल्याप्रकरणी सागर पाटील याच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देवून केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील हे मंगळवारी दुपारी जलचक्र तांडा ता. बोदवड जि. जळगांव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी उपस्थित राहिले. त्यांच्या तिथे उपस्थित राहिल्याबद्दल रात्री दहा वाजेच्या सुमारास सागर प्रभाकर पाटील या तरुणाने फेसबूक अकाउंटवरून त्यांच्याबद्दल बदनाम कारक पोस्ट केली. सदर व्यक्ती वारंवार अशा आशयाच्या पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात नमूद त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. पोलीस अधीक्षक, व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , सुदाम पाटील , माजी नगरसेवक सुनिल माळी , माजी सरचिटणीस सुशील शिंदे, विशाल देशमुख, अकिरभाई पटेल, रितेश पाटील, योगेश लाडवंजारी उपस्थित होते