Home Cities जळगाव देशविरोधी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई करा:स्वराज्य सेनेची मागणी

देशविरोधी कृत्ये करणाऱ्यांवर कारवाई करा:स्वराज्य सेनेची मागणी


जळगाव (प्रतिनिधी) येथील स्वराज्य निर्माण सेनेतर्फे सोमवारी शहरातून एक मूक मोर्चा काढण्यात येऊन देशविरोधी कारवाया करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

संघटनेने या निवेदनात म्हटले आहे की, देशात वारंवार दहशतवादी हल्ले व भारतीय सैन्यावर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमिवर या दहशतवाद्यांना आपल्या बेताल वक्तव्यातून खतपाणी घालणारे राजकीय नेते, राष्ट्रविरोधी घोषणा देणारे व दुसऱ्या देशाचा ध्वज फडकवणारे नागरिक हे अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना साथ देत असतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आपल्या या मागण्या शासनापर्यंत पोहचवाव्या, असेही या निवेदनात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound