Home क्राईम रेल्वे स्थानकावर अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

रेल्वे स्थानकावर अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

0
178

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्थानकावरील नवीन दादऱ्याखाली २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक ४५ वर्षीय अनोळखी पुरुष गंभीर आजारी अवस्थेत मिळून आला.

स्टेशन मास्टर अरुण सोपान नाफडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाला तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ७ वाजता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचा मृत्यू हा दीर्घ आजारामुळे नैसर्गिकरीत्या झाला असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.

सध्या मयताची ओळख पटलेली नसून, त्याचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. ज्या कोणाला या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास त्यांनी जळगाव रेल्वे पोलीस चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलीस हवालदार सचिनकुमार जगदीश भावसार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound