टागोरांच्या कविता , योगाचे उदाहरण देत चीनकडून साळसूदपणाचा आव

 

बीजिंग, वृत्तसंस्था । भारताने डेटा चोरी आणि राष्ट्रीय सुरक्षितेच्या मुद्यावर २२४ चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये टिकटॉक, हॅलो, पबजी, कॅम स्कॅनर अशा विविध अॅपचाही समावेश आहे. अॅप बंदीवर चीनने आपली नाराजी व्यक्त केली असून अशी बंदी घालणे गुंतवणूकदारांच्या विरोधात असल्याचे चीनने म्हटले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगतिले की, रविंद्रनाथ टागोर यांच्या कविता चीनमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीय योग देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. मात्र, कविता आणि योग हे चिनी संस्कृतीवर आक्रमण आहे, असे आम्ही समजत नाही

भारताने केलेली अॅप बंदी ही जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने निष्पक्ष पद्धतीने कोणत्याही भेदभावाशिवाय व्यवसाय, व्यापारासाठी वातावरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे चीनने म्हटले आहे.

देशातील युजर्संची खासगी सुरक्षा धोक्यात येत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा भारत सरकारने पबजीसह ११८ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी केलेल्या अॅप बंदीमुळे चीनला मोठा आर्थिका फटका बसला होता. टिकटॉक बंदीनंतर बाइट डान्स या मूळ कंपनीला अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागले होते

Protected Content